Gold Silver Price Week: आठवड्याभरात सोने-चांदीच्या दराचा गुंतवणूकदारांना दिलासा, जागतिक घडामोडींचा प्रभाव कायम राहणार
esakal February 22, 2026 01:45 PM

Gold Price Drop News : आठवड्याभरात सोने-चांदीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना दिलासा दिला. सलग घसरण होत असल्याने गुंतवणूक दारांसह व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळत आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. मागील सात दिवसांत सोन्याच्या किमतीत 0.23 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांना सकारात्मक संकेत मिळाले आहेत.

Multi Commodity Exchange of India (एमसीएक्स) वर चांदीच्या दरात लक्षणीय घट झाली. बाजार बंद होताना सोन्याचा दर १ लाख ५६ हजारा होता तर शेवटच्या दिवशी चांदीच्या दरात वाढ होऊन 2 लाख 52 हजार 042 प्रति किलोपर्यंत पोहोचला. चांदीतील वाढीमागे केवळ गुंतवणूक नव्हे, तर ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिक वाहनं आणि एआय क्षेत्रातून वाढणारी औद्योगिक मागणी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, India Bullion and Jewellers Association (आयबीजेए) च्या माहितीनुसार बाजारभाव सुरू होताना सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते तर चांदीच्या दरातील अस्थिरता कायम जाणवू शकते. एमसीएक्स आणि National Stock Exchange of India (एनएसई) यांनी घेतलेल्या निर्णयाचाही बाजारावर परिणाम झाला आहे. गुरुवारपासून सोन्यावरचे 3 टक्के आणि चांदीवरचे 7 टक्के अतिरिक्त मार्जिन हटवण्यात आले. या निर्णयामुळे सट्टेबाजी आणि इंट्राडे व्यवहारात वाढ झाली असून दरवाढीस चालना दिसून आली.

Gold Astrology Secrets : या 3 राशींच्या नशिबात आहे 'राजयोग'! अंगावर सोने घालताच होईल पैशांचा पाऊस; तुमची रास यात आहे का?

गुंतवणूकदारांसाठी सल्ला

जागतिक घडामोडींचा प्रभाव अजूनही कायम आहे. Federal Reserve ने व्याजदरांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नसल्याने अनिश्चितता आहे. त्यातच डॉलर मजबूत होत असल्याने सोन्यावर दबाव येऊ शकतो. तरीही जागतिक भूराजकीय तणाव कायम असल्याने सोने आणि चांदी हे ‘सेफ हेवन’ गुंतवणुकीचे पर्याय राहतील, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.