इंदापूर येथे रक्तदान, आरोग्य शिबिर
esakal February 22, 2026 04:46 PM

इंदापूर, ता. २१ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिर, तसेच लहान मुलांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवयुवक फाउंडेशन, पोरापोरांची चावडी यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य यशराज अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्य श्रीराज दत्तात्रेय भरणे, उपनगराध्यक्ष शैलेश पवार, गटनेते शकील सय्यद, नगरसेवक शुभम पवार, सागर आरगडे, प्रशांत उंबरे, माजी नगराध्यक्ष सुरेश गवळी, माजी नगरसेवक अमर गाडे, गजानन गवळी, पांडुरंग शिंदे,अशोक मखरे, ॲड. आनंद केकाण, सुभाष खरे यांनी भेट देत शिवरायांना अभिवादन करत उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या शिबिरामध्ये ११० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात योगदान दिले, तर लहान मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉ. रविराज शिंदे यांनी पुढाकार घेतला. यावेळी नेत्रचिकित्सक डॉ. अभिजित बर्गे आणि डॉ. रेश्मा घोडके यांनी डोळ्यांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड. श्रेयस गवळी, रोहित माने, अक्षय क्षीरसागर, ओंकार जामदार, गणेश सूर्यवंशी, यश जाधव, रोहित थोरात यांच्यासह नवयुवक फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.