अमेय मडव यांना 'समाजमित्र' पुरस्कार
esakal February 23, 2026 08:45 AM

26446

अमेय मडव यांना ‘समाजमित्र’ पुरस्कार
बांदा ः लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘समाजमित्र’ पुरस्कार सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अमेय मडव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, सचिव दीपेश परब, अरुण राऊळ, दीपक राऊळ, गणेश गावडे, सतीश गावडे, विकास गावडे, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, उमेश परब, वामन परब, दामोदर परब, बाळकृष्ण परब तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका उपाध्यक्ष रुजाय फर्नांडिस, सहसचिव यशवंत महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी श्री. मडव यांचा गौरव करण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.