काळू धरण बाधित गावांच्या ग्रामसभा रद्द
esakal February 23, 2026 03:45 PM

मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यात काळू नदीवर प्रस्तावित धरणासाठी बाधित गावांमध्ये विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर या ग्रामसभा अखेर तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आल्या आहेत.

मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बाधित गावांत ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात तळेगाव येथे ग्रामस्थांची सभा होऊन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने पुनर्विचार करत संबंधित ग्रामसभा स्थगित केल्याचे पत्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठवले आहे. या निर्णयामुळे बाधित गावांतील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.