Jammu Kashmir Tourism: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ; उमर अब्दुल्ला यांची विधानसभेत माहिती
esakal February 23, 2026 07:45 PM

जम्मू : कोरोना महासाथी ओसरल्यानंतर २०२३ ते २०२५ या कालावधीमध्ये जम्मू-काश्मीर पर्यटनात मोठी वाढ झाल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत दिली.

२०१६-१८ मध्ये जम्मू-काश्मीरला ४.७६ कोटी पर्यटकांनी भेट दिली, तर २०२३ ते २०२५ दरम्यान ७.८५ कोटी पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद हसन बेग यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

वर्ष विभाग पर्यटक संख्या विभाग पर्यटक संख्या

  • २०१६ काश्मीर २०.० लाख जम्मू १२२.८ लाख

  • २०१७ १९.३ लाख १३३.१ लाख

  • २०१८ २०.१ लाख १६०.४ लाख

  • २०२३ ९६.३ लाख १८०.२ लाख

  • २०२४ ९८.१ लाख २००.९ लाख

  • २०२५ ४७.७ लाख १६२.३ लाख

प्रमुख पर्यटन स्थळे

गुलमर्ग १६.२ लाख

१३.६ ला

पहलगाम १४.५ लाख

१२.६ ला

सोनमर्ग ५.५५ लाख

८.८९ लाख

UP Tourism Budget : युपी पर्यटनातून करणार मोठी कमाई; महिला गाईडसना मोठा दिलासा आणि ५० हजार होमस्टेचा मास्टर प्लॅन धार्मिक पर्यटकांच्या संख्येतही वाढ

श्री माता वैष्णोदेवी मंदिर येथे २०२४ मध्ये ९५.५ लाख भाविकांनी दर्शन घेतले, तर २०२३ मध्ये हा आकडा ९०.३ लाख होता. २०२५ मध्ये आतापर्यंत ६९.३ लाख भाविकांची नोंद झाली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.