अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी बैठक काय घडले? देवेंद्र फडणवीस बोलले स्पष्टच, म्हणाले, त्यादिवशी…
Tv9 Marathi February 23, 2026 07:45 PM

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार होते. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून या अर्थसंकल्पाची तयारी करत होते. मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या विमानाची भीषण अपघात झाला. शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कधीच असा विचार केला नव्हता की, असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल. लाडकी बहीण योजना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट घालून सुरू केली आणि आम्हाला सर्वांनाही गुलाबी जॅकेट घालायला लावले होते. अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणे ही घटनात्मक जबाबदारी आहे, पण ही गोष्टी माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. दुर्देवाने अजितदादा आपल्यात नाहीत, ही खंत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आपण म्हणतो की, काही गोष्टींवर काळ हे आैषध आहे पण अशा गोष्टींवर काळ हे आैषध नाही, वेदना कायम असतात. निर्णय घेताना अजित पवार मागे पुढे पाहत नव्हते. अजित पवार यांच्या शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस भावूक होताना देखील दिसले. एक मित्र आज नसल्याची खंत आहे.

अशाप्रकारे अजित पवार दुसरे होऊ शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट शिस्तीत झाली पाहिजे, असे अजित पवारांचे म्हणणे असायचे. सकाळी 6 पासून काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अजित पवारांचे जाणे ही वेदना आहे. कुठलीही गोष्ट नियोजन करूनच करणारे दादा होते. खरमध्ये त्यांचा आणि माझा जन्म 22 जुलैचा ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि ते माझ्यासाठी दादाच होते.

कदाचित ते आमच्यासोबत उशिरा आले. पण एक दहशकापासून आमची चांगली मैत्री होती आणि जवळीकता होती. 2014 नंतर एक भावनिक नातं अजित पवार यांच्यासोबत झालं. सगळ्या गोष्टी आता फक्त आठवणीत राहिल्या. दादा अंत:करणातून प्रेम करणारे नेते होते. 27 जानेवारीला आमची बैठक झाली. त्याही बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना प्रश्न केले. ती सर्व बैठक आम्ही संपवली.

त्यानंतर आम्ही आमच्या अॅंटी चेंबरला गेलो. मग 30 ते 40 मिनिटे आम्ही वेगवेगळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर दादा तिथून गेली. पण त्यावेळी थोडीही कल्पना नव्हती की, त्यावेळी दादांची ही शेवटची भेट ठरेल. ज्यावेळी अजित पवारांच्या अपघाताची बातमी आहे, त्यावेळी वाटले ठीक आहे अपघात झाला काहीही झाले नसेल. निधनाची बातमी आली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.