'तुझं नशीबच खूप चांगलं आहे गं' म्हणणाऱ्या बायकांना तेजश्री प्रधानने सुनावलं; म्हणाली, 'मी रात्रभर रडले...'
esakal February 23, 2026 10:45 PM

लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच मात्र ती तिच्या स्वभावाने देखील प्रेक्षकांची लाडकी बनलीये. तेजश्रीने 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून चाहत्यांच्या मनात घर केलं. सुंदर, प्रेमळ अशी जान्हवी प्रेक्षकांना भावली. सध्या ती 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यातदेखील ती शांत समंजस स्वानंदीची भूमिका साकारतेय. मात्र असं असतानाही अनेकदा कलाकारांना जज केलं जातं. यांना सहजपणे गोष्टी मिळाल्यात असा अनेकांचा समज असतो. अशा लोकांना तेजश्रीने आता उत्तर दिलंय.

तेजश्रीने तिचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'लोक म्हणतात की ती नशीबवान आहे. पण, नाही, ती नशिबवान नाही. तिने खूप मेहनत केली आहे. तिने तिच्या जवळच्या लोकांना गमवले. तिने उशिरापर्यंत जागून काम केले आहे. ती अनेकदा रडत झोपली आहे. तिने टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. तिने स्वत:कडे लक्ष दिले. तिला अनेक वेळा हार मानावी वाटली, पण तिने हार मानली नाही. कारण हार मानणे हा पर्याय नाही, यावर तिचा विश्वास आहे.' अशी पोस्ट करत तिने समोरच्याला सगळं सहजसोप्या पद्धतीने मिळालंय असं म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडावर चपराक मारलीय.

View this post on Instagram

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)