रेवतीचं लग्न झालं म्हणून मुद्दाम पोस्ट केलीस का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला आदीश वैद्य; म्हणतो- तिला प्रेम मिळालं म्हणून...
esakal February 23, 2026 11:45 PM

'रात्रीस खेळ चाले', 'कुंकू टिकली आणि टॅटू', ''बिग बॉस मराठी ३' मध्ये झळकलेला अभिनेता आदिश वैद्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने केलेल्या पोस्ट अभिनेत्री रेवती लेले हिच्याशी जोडण्यात येतायत. त्याचं कारण म्हणजे रेवतीने दोन दिवसांपूर्वीच डिझायनर कौशिक भिडेसोबत लग्नगाठ बांधली. त्यांनी त्यांचे लग्नाचे फोटोही शेअर केले. मात्र कौशिकसोबत लग्न करण्याआधी रेवती आदिशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे सोशल मीडियावर चर्चेत असायचे. मात्र काही कारणांनी त्यांचा ब्रेकअप झाला. आता रेवतीच्या लग्नाच्या दिवशी आदीशने केलेल्या पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

रेवतीच्या लग्नानंतर आदीशने एक पोस्ट केली होती. ज्यात तो क्रिकेट खेळताना दिसतोय. त्यावर त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तू खेळ बिनधास्त मी आहे तुझ्यासोबत, अशा मुलीसोबत लग्न करायचं आहे'. तर यानंतर त्याने आणखीएक पोस्ट केली ज्यात आदिशच्या एका हातात दुसरा हात दिसत असून त्या हातात स्क्रंची घातलेलं दिसत आहे. मात्र पुढच्याच फोटोत हे दोन्ही हात त्याचेच असल्याचं समोर आलंय. या फोटोवर कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, 'मेरे हाथ मे, मेरा हाथ हो...सारी जन्नते मेरे साथ हो' मात्र या पोस्टवर एका चाहतीने कमेंट करत त्याला विचारलं, 'तू रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?'

View this post on Instagram

A post shared by Adish Vaidya (@adishvaidya_92)