पुण्यात मोठा राडा; काँग्रेस नेत्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Saam TV February 24, 2026 12:45 AM

पुण्यात काँग्रेस नेत्याला मारहाण

एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस नेत्यावर हल्ला

मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुण्यात मोठा राडा झाला आहे. पुण्यात काँग्रेस नेत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर मारहाणीची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

पुण्यात एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. हनुमंत पवार हे डिबेट शोसाठी संबंधित ठिकाणी गेले होते. त्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

हनुमंत पवार यांना मारहाण झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज 'एक्स'वर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मारहाणीची घटना उजेडात आल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून कारवाईची मागणी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करत म्हटलं की, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना एका वृ्त्तवाहिनी, मित्र मंडळ चौक पुणे येथे भाजपचे तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो'.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

'देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरूंगात टाकण्यात यावे, त्याची खरी जागा तीच आहे, अशा शब्दात काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.