Vastu Shastra : घरात झाडं कोणत्या मुहूर्तावर लावावेत? वास्तुशास्त्रात सांगितलेत वृक्षारोपणाचे नियम
Tv9 Marathi February 24, 2026 02:45 AM

तुम्हाला हे माहिती आहे का, वृक्षारोपणाचा देखील वास्तुशास्त्राशी जवळचा संबंध आहे. सर्व सामान्यपणे अनेकजण कोणत्याही वेळी आणि केव्हाही घरात झाडं लावतात. तर काही लोक हे ऋतु पाहून झाडं लावतात, पावसाळ्याच्या ऋतुमध्ये अनेक जण आपल्या घरात वृक्षारोपण करतात. तर काही जण दोन ते तीन महिन्यांनी आपल्या घरातील कुंडीत असलेलं एखादं झाड काढून त्यावेजी दुसऱ्या झाडांची लागवड करतात. परंतु, वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही अतिशय शुभ मानली जातात. ही झाडं जेव्हा आपण घरात लावतो, तेव्हा सर्व प्रकाराची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. परंतु हे वृक्ष जेव्हा आपण वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार लावतो, तेव्हा त्याचा प्रभाव हा दुप्पट पडतो. चला तर मग जाणून घेऊयात, वृक्ष लागवडीसंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये नेमके काय नियम सांगण्यात आले आहेत? त्याबद्दल.

वृक्ष लागवडीसाठी शुभ दिवस-वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर घरात एखादं शुभ झाड लावत असाल तर ते झाडं शुभ मुहूर्त आणि नक्षत्र पाहूनच लावलं गेलं पाहिजे, त्यामुळे तुम्हाला त्याचं दुप्पट फळ मिळतं. वास्तुशास्त्रानुसार शुल्क पक्षाच्या आष्टमी पासून ते कृष्ण पक्षाच्या सप्तमीपर्यंतचा काळ हा वृक्ष लागवडीसाठी शुभ असतो. सुरुवातील वृक्ष हे नेहमी कुंडीत लावले पाहिजेत, आणि जेव्हा ते थोडे मोठे होतील तेव्हा त्यांना कुंडीतून काढून तुम्ही जमिनीवर लावू शकतात. त्यामुळे त्या झाडांचा चांगला विकास होतो.

ही कामं देखील करा – आपण जेव्हा वृक्ष लावतो, तेव्हा त्याची काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं असतं, काही झाडं अशी असतात ज्यांना खूप जास्त पाणी लागतं, तर काही झाडं थोड्या पाण्यावर देखील चांगली बहरतात, त्यामुळे झाडांच्या गरजेनुसार पाण्याचं योग्य व्यवस्थापन करावं. तसेच वेळोवेळी त्यांची छाटनी देखील करणं गरजेचं असतं. त्यांना आवश्यकतेनुसार खत आणि इतर गोष्टी द्याव्यात. किटकनाशकांचा वापर करावा, त्यामुळे झाडांवर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.