मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मृत्यूला टाळणे अशक्य आहे, मात्र तरीही लोक त्याबद्दल बोलणे आणि विचार करणे टाळतात. अनेकांना नैसर्गिक मृत्यू येतो, तर काहीजण आजारपणामुळे मरण पावतात. लोकांना मृत्यूवर बोलणं आवडत नसलं तरी ICU मध्ये काम करणारे लोक हे दररोज आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू पाहत असतात. अमेरिकेच्या फ्लोरिडातील 29 वर्षीय नर्स कर्स्टी रॉबर्ट्स यांनी लोकांची मृत्यू अनेकदा डोळ्यासमोर पाहिला आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी अनेक रुग्णांचे अखेरचे श्वास आपल्या डोळ्याने पाहिलेले आहेत. अशातच आता त्यांनी मृत्यूपूर्वी लोकांची शेवटची वाक्ये काय असतात याबाबत माहिती दिली आहे. याबाबत जाणून घेऊयात.
अनेकांना आधीच मृत्यूची चाहूल लागतेकर्स्टी यांचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 6 लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, अनेक रुग्ण मृत्यूच्या अगोदर एक प्रकारचा आध्यात्मिक बदल अनुभवतात. हा बदल वैद्यकीय शास्त्रासाठी पूर्णपणे समजावून सांगणे सोपे नाही. कर्स्टी यांच्या मते ही वेळ वेगळीच असते जी रुग्णाच्या शेवटच्या क्षणांना वेगळ्याच प्रकारची शांतता देतो. अनेक रुग्ण आपल्या शेवटच्या क्षणांत एकसारख्याच गोष्टी बोलतात. त्यांची प्रकृती बाहेरून प्रकृती ठीक दिसत असली तरी त्यांना मृत्यूची चाहूल लागलेली असते.
मृत्यूपूर्वीचे शब्द काय असतात?कर्स्टी रॉबर्ट्स यांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी काही रूग्ण ‘माझ्या कुटुंबाला सांगा की मी त्यांच्यावर प्रेम करतो.’ काहीजण म्हणतात की, ‘मला बरं वाटत नाही.’ काही रुग्ण असंही म्हणातात की ‘मला माहित आहे की मी आता जाणार आहे.’ तसेच काही लोक ‘मला वाटतं कोणीतरी मला बोलावत आहे’ असं म्हणतात. अशा वाक्यांनंतर थोड्याच वेळात अनेक रुग्ण या जगाचा निरोप घेतात.
औषधांचा परिणाम थांबतो आणि…‘मिरर’च्या अहवालानुसार, कर्स्टी यांनी सांगितले की, अनेकदा रुग्णांच्या सर्व टेस्ट आणि व्हायटल्स सामान्य असतात. त्यांच्या शरीराला कोणताही मोठा धोका दिसत नाही. मात्र तरीही अचानक काहीतरी बदलते. हा बदल यंत्रणादेखील पकडू शकत नाही. याला एक प्रकारचे ट्रांजिशन म्हणता येईल. हा असा क्षण असतो, जेव्हा औषधांचा परिणाम थांबतो आणि आत्मा हळूहळू निरोपाची तयारी करत असल्यासारखे वाटते.