पुणे : बेंगळुरू येथे झालेल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पुण्याच्या वैष्णवी आडकरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविणाऱ्या पुण्याच्या वैष्णवी आडकरला अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत १२४ व्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमच्या हॅने वांडेविंकेलने जोरदार खेळ करीत ६-०, ६-१ असे पराभूत केले.
वैष्णवी आडकर जागतिक क्रमवारीत ६९०व्या क्रमांकावर आहे. विजेतेत्या ठरलेल्या बेल्जियमच्या हॅने वांडेविंकेलला १०० डब्लूटीए गुण आणि १५ हजार २३९ अमेरिकन डॉलर, तर पुण्याच्या वैष्णवी आडकरला ६५ गुण आणि ८,१४७ अमेरिकन डॉलरचे पारितोषिक मिळाले.
India Open 2026: लक्ष्य सेनचा भारताच्याच आयुष शेट्टीविरुद्ध विजय; ट्रीसा-गायत्री, हरिहरन-अर्जुन जोडीचीही आगेकूच‘माझ्यासाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा ठरला. या स्पर्धेतून मी बऱ्याच गोष्टी शिकले आणि विशेषतः गेल्या वर्षीच्या कठीण काळानंतर. या यशाने माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे,’ असे वैष्णवी आडकर म्हणाली.