भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात मंगळवारपासून (२४ फेब्रुवारी) वनडे मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनला सुरू असून या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरू शकलेली नाही. यामागील कारण बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे.
AUS vs IND: टी२० नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचा निर्धार, आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ODI मालिकेला सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रकया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४८.३ षटकात सर्वबाद २१४ धावा केल्या होत्या. भारताकडून स्मृती मानधाने (Smriti Mandhana) ६८ चेंड़ूत ५८ धावा केल्या आहेत. तसेच हरमनप्रीतने ८४ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. या दोघींशिवाय केवळ काशवी गौतम आणि रिचा घोष या दोघींनीच २० धावांचा टप्पा पार केला.
पण हरमनप्रीतला फलंदाजीदरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे ती नंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरू शकलेली नाही. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. तसेच बीसीसीआयने सांगितले की सध्या वैद्यकीय पथक तिच्यावर उपचार करत आहे. तिच्या अनुपस्थितीत उपकर्णधार स्मृती मानधना संघाचे नेतृ्त्व करत आहे.
श्री चरणीच्या दमदार गोलंदाजी२१५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हेली आणि फोबी लिचफिल्ड यांनी चांगली सुरुवात केली होती. दोघींनी अर्धशतकी भागीदारीही केली होती. पण त्यांची भागीदारी रंगत असताना ११ व्या षटकात श्री चरणीकडे मानधनाने चेंडू सोपवला.
तिनेही हा विश्वास सार्थ ठरवत तिसऱ्याच चेंडूवर लिचफिल्डला ३२ चेंडूत ३२ धावांवर बाद केले. तिला यष्टीरक्षक रिचा घोषने यष्टीचीत केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर श्री चरणीने जॉर्जिया वॉल हिला स्मृती मानधानाच्या हातून झेलबाद केले.
त्यामुळे दोन चेंडूत ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर एलिसा हेली आणि बेथ मुनी यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत अर्धशतक केले. एलिसा हेली ५० धावा करून बाद झाली.