रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा अंतिम सामना हुबळी येथील केएससीए मैदानावर होत आहे. या सामन्यात कर्नाटक आणि जम्मू आणि काश्मीर संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा जम्मू काश्मीरच्या बाजूने लागला. यानंतर कर्णधार पारस डोगरा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी 87 षटकांचा खेळ झाला आणि जम्मू काश्मीरने 2 गडी गमवून 284 धावा केल्या आहे. जम्मू काश्मीरची पहिली विकेट संघाच्या 18 धावा असताना पडली. कामरान इकबाल 6 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शुभम पुंडीर आणि यावर हसन यांनी 139 धावांची भागीदारी केली. 244 चेंडूपैकी 120 चेंडूंचा सामना करत शुभम पुंडीरने 58 धावा आणि यावर हसनने 124 चेंडूंचा सामना 78 धावा केल्या. यावर हसने 88 धावांवर असताना बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तर कर्णधार पारस डोगरा फलंदाजीला आला आणि दुखापत झाल्याने 9 धावांवरच रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर शुभम पुंडीर आणि अब्दुल समद यांनी डाव सावरला. या दोघांमध्ये नाबाद 105 धावांची भागीदारी झाली आहे. तर शुभम पुंडीर नाबाद 117 आणि अब्दुल समद नाबाद 52 धावांवर खेळत आहे.
जम्मू काश्मीरने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला आहे. त्यामुळे त्यांचा मानस दुसऱ्या दिवशी 500 पार धावा करण्याचा असेल यात काही शंका नाही. कारण जेतेपद मिळवायचं असेल. पहिल्या डावातील रणनिती खूपच महत्त्वाची असते. अन्यथा सामना ड्रॉच्या स्थितीत पोहोचला तर जेतेपद हातून जाऊ शकतं. तुम्हालाही हा सामना बरोबरीत सुटला तर विजेता कोण असेल असा प्रश्न पडला आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे आहे.