आण्णा ग्रुपच्या आठव्या होम मिनिस्टर ठरल्या उज्वला हेग्गे
esakal February 25, 2026 12:45 PM

VRG26B06211
वैराग ः होम मिनिस्टर म्हणून उज्वला हेग्गे पैठणीचे बक्षीस स्वीकारताना.

होम मिनिस्टरच्या विजेत्या ठरल्या उज्वला हेग्गे
वैराग : येथील अण्णा ग्रुप शिवजन्मोत्सव समितीतर्फे होम मिनिस्टरचा महासंग्राम सोहळा घेण्यात आला. यामध्ये उज्वला सागर हेग्गे इलेक्ट्रीक स्कूटर व पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय बक्षीस (फ्रीज) सोनाली आनंद खेंदाड, तृतीय मयूरी बुरगुटे (कुलर), चतुर्थ (मिक्सर) आरती ढेगळे, पाचवे (होमथियटर) रेश्मा काटमोरे यांनी पटकावले. या स्पर्धेत सुमारे ५०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अभिनेते क्रांती मळेगावकर यांनी विनोदी अभिनयाने सोहळ्यांची रंगत वाढवली. कविता राजेंद्र राऊत व रचनाताई संतोष निंबाळकर, नगरसेविका राणीताई वैजीनाथ आदमाने, अंकिता राऊत, मृणाल राऊत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेविका अर्चना माने रेड्डी, भाग्यशालिनी भालशंकर, सई निंबाळकर, जयश्री घोडके यांच्यासह शेकडों महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सचिन पानबूडे यांनी केले तर आभार महेश पन्हाळे यांनी मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.