'ज्येष्ठांना सुविधा द्या'
esakal February 26, 2026 06:45 AM

‘ज्येष्ठांना सुविधा द्या’
निगडी, ता. २५ ः ‘‘निगडी प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिकांना योग्य त्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात’’, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंद मुळूक, सुभाष राणे, उमेश कुलकर्णी यांनी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, महापालिकेचे ‘अ’ प्रभागातील अधिकारी उपस्थित होते. प्राधिकरणातील सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, भटके श्वान, रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, जलनिस्सारण, वाढते अपघात याकडेही नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे, असेही त्या निवेदनात म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.