तळेरे वाचनालयातर्फे उद्या वक्तृत्व स्पर्धा
esakal February 26, 2026 09:45 AM

तळेरे वाचनालयातर्फे उद्या वक्तृत्व स्पर्धा
तळेरे : येथील सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) होणाऱ्या मराठी राजभाषा दिनानिमित्त तळेरे पंचक्रोशी मर्यादित शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते नववी अशा दोन गटांत होणार आहे. पहिल्या गटासाठी ‘माझी मायबोली मराठी’ आणि दुसऱ्या गटासाठी ‘मराठी भाषेच्या देशव्यापी प्रसारणाची आवश्यकता’ असे विषय असून, स्पर्धकांनी पाच मिनिटांत विषय मांडायचा आहे. या स्पर्धेत तळेरे, कासार्डे, नाधवडे, गवाणे, वारगाव, साळिस्ते या गावांतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. दोन्ही गटांतील प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ दोन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, सचिव मिनेश तळेकर, ग्रंथपाल साक्षी तळेकर यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन वाचनालयाने केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.