चासमध्ये विश्वकर्मा मंदिराचा वर्धापनदिन
esakal February 26, 2026 11:45 AM

चास, ता. २५ : चास (ता. खेड) येथील लिंबपेठ सुतार आळी येथे बांधण्यात आलेल्या श्री गणपती, श्री विठ्ठल रखुमाई व श्री विश्वकर्मा मंदिराचा दहावा वर्धापन दिन आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय युवा कीर्तनकार ऋतिका कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रंमुग्ध झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
चास येथील लिंबपेठ, सुतार आळी येथील तरूणांनी एकत्र येत दहा वर्षांपूर्वी गणपती, विठ्ठल रखुमाई, विश्वकर्मा यांचे मंदिर उभारलेले असून या मंदिराचा दहावा वर्धापन दिन मंगळवारी (ता. २४) साजरा करण्यात आला. सकाळी मान्यवरांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, पूजा पार पडल्यावर नेमाचे भजन करण्यात आले. सायंकाळी हरिपाठ पार पडल्यावर सुरेश गंजाळ यांच्या स्मरणार्थ प्रकाश गंजाळ, दीपक गुंजाळ यांच्या सौजन्यातून ऋतिका कदम यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री संजयभाऊ घनवट युवा मंच, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल टोके, सरपंच विनायक मुळूक, पोलिस हवालदार सुनील बोकड यांच्या वतीने भाविकांना देण्यात आलेल्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी उद्योजक संदीप घनवट, उपसरपंच सुनील वाळुंज, नवनाथ वाळुंज, अजित घनवट, समाधान राक्षे, संदीप ढमढेरे, प्रतीक बोऱ्हाडे उपस्थित होते. भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ गुंजवठा यांच्या वतीने रात्री जागर करण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.