केळघरला पतीपाठोपाठ चोवीस
तासांत पत्नीचेही निधन
केळघर, ता. २५ : पतीच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पत्नीचेही निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील सेवानिवृत्त तलाठी श्रीरंग मारुती मोरे (वय ७८) यांचे सोमवारी (ता. २३) रात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवारी त्यांच्यावर सकाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीरंग मोरे यांचा मुलगा विनोद मोरे यांचेही तीन आठवड्यापूर्वी निधन झाले आहे. याचा श्रीरंग मोरे व त्यांच्या पत्नी अनुसया मोरे यांना धक्का बसला होता. पती श्रीरंग मोरे यांच्या निधन झाल्याचे समजताच त्याचा पत्नी अनुसया यांना धक्का बसला. माेरे यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर अवघ्या एक दिवसात आज सकाळी अनुसया मोरे (वय ७५) यांचेही निधन झाले. आज सकाळी श्रीरंग मोरे यांचा सावडण्याचा विधी होता. सावडण्याचा विधीनंतर अवघ्या दीड तासाच अनुसया मोरे यांचे निधन झाले. पती पाठोपाठ पत्नीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
A01404
....................................