बारामती: अजित पवारांच्या विमान (Ajit Pawar Plane Crash death) अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी. व्हीएसआर कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी यासाठी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहे, काल त्यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात पत्र दिलं, त्याचबरोबर कडक कारवाई करण्याती मागणी केली, अशातच आज रोहित पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहेत. यावेळी अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. अजित पवारांचे भाऊ राजेंद्र पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक बारामती पोलिस स्टेशनसमोर एकवटले आहेत. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देण्यात येत आहे. जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे, असं म्हणत हातात पोस्टर घेऊ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत.(Ajit Pawar Plane Crash death)
राजेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले, रोहित पवार आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून जी काही मागणी करायची ती करतील. पण सर्वसाधारणपणे बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना जो मोकळेपणा पाहिजे, याबाबतची माहिती पाहिजे ती मिळत नसल्याने लोकांना या शंका जास्त येत आहेत, असं म्हटलं आहे. तर रोहित पवार यांच्या पाठिंबासाठी जमलेल्या अनेक समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलताना म्हटलं की, अनेक शक्ती हा गुन्हा दाखल करू देत नाहीत, म्हणून आम्ही आज बारामतीकर मोठ्या संख्येने हा गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी येथे जमलो आहोत. आम्हाला घातपात वाटतोय, कारण त्यांच्याकडून जे सांगण्यात येत आहे, ब्लॅक बॉक्स जळाला वगैरे वगैरे, या गोष्टी संशयास्पद वाटत आहेत, सर्वांनीच जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि जो अपघाताचा रिपोर्ट आहे, तो दिला पाहिजे. पण आम्हाला हा घातपात असल्याचा जाणवत आहे असेही पुढे काही समर्थकांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar Plane Crash death)
तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या युगेंद्र पवार यांनी बोलताना म्हटलं की, व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. इथे दादांचे समर्थक, दादांचे प्रेमी आणि बारामतीचे नागरिक जमले आहेत आणि संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल व्हावा, योग्य ती कारवाई व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, आम्ही सगळे रोहित दादांच्या मागे उभे आहोत. अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे, या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे, बारामती पोलिसांकडून न्याय मिळेल याची आम्हाला 100% खात्री आहे. डीजीसीएचा रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की क्रिमिनल नेगलिजेंस (Criminal negligence) मुळे विमानाचा मेंटेनन्स न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत, हे आपल्याला रिपोर्ट मध्ये दिसताना, क्रिमिनल नेगलिजेंस जर हे डीजीसीए कडून येत असेल तर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कंपनीची सखोल चौकशी झाली पाहिजे, या सगळ्याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे आणि लवकर झाली पाहिजे हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. आतापर्यंत कोणती कारवाईने झालेली आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आहे आम्हाला विश्वास आहे की आपल्या सर्वांना न्याय मिळेल.