महापौरांचा सत्कार
esakal February 26, 2026 07:45 PM

मोशी, ता. २६ : इंद्रायणी साहित्य परिषदेच्यावतीने महापौर रवी लांडगे यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. परिषदेच्या साहित्य विषयक उपक्रमांची त्यांना माहिती देण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, उपाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, सचिव रामभाऊ सासवडे, साहित्यिक डॉ. पौर्णिमा कोल्हे, हवेली पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सस्ते यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार नेते माणिक सस्ते, काळुराम सस्ते, उद्योजक अशोक ढोकले, महिपत साठे, संतोष सस्ते, तेजस्विनी देशमुख आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.