आनंद दिघेंचे जवळचे सहकारी, शिवसैनिक उद्धवराव जगताप यांचं निधन
Saam TV February 27, 2026 03:45 AM

उद्धवराव जगताप यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

ठाण्याच्या राजकीय वर्तुळातून दु:खद बातमी आली आहे. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेंच्या जवळचे सहकारी, ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी वयाच्या ९८ व्या वर्षीय जगाचा निरोप घेतला आहे.

दिवंगत आनंद दिघे यांचं अत्यंत जवळचे सहकारी ९८ वर्षीय ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांचं निधन झालं. उद्धवराव जगताप यांनी आनंद दिघे यांच्यासोबत केलं आहे. दिघे यांनी उद्धवराव यांना ठाण्याचं 'शहर शाखाप्रमुख' पद दिलं होते. शहरातील अनेक शिवसैनिकांना उद्धवराव जगताप यांनी मार्गदर्शन केलं आहे. आनंद दिघे यांच्या जीवनावरील 'धर्मवीर' चित्रपटात उद्धवराव यांच्या नावाचे देखील पात्र दाखवण्या आले होते.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

ठाण्यातील मुल्ला बाग निळकंठ येथे जगताप राहायला होते. त्यांनी शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत राहणं पसंद केले होते. ते शिवसेनेच्या अनेक आंदोलने आणि मेळाव्यांना उपस्थित राहायचे. काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे शिवसेना शाखेवरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला होता. त्यावेळी शाखेसाठी स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरले होते. शाखेजवळ उद्धव ठाकरे आले होते, त्यावेळी शिंदे गटासोबत उद्धवरावांनी शाखेसमोर बसले. त्यानंतर शाखा माझ्याच नावावर आहे, असे त्यांनी मीडियावर ठणकावले होते.

खोट्या तक्रारी करणाऱ्यांना शिक्षा होणार; सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारे, मानवाधिकार आयोगाला नोटीस

ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनीही उद्धवराव जगताप यांना श्रद्धांजली वाहिली. माजी खासदार राजन विचारे यांनी म्हटलं की, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेले आणि ठाणे शिवसेनेच्या प्रवासात मोलाची कामगिरी निभावणारे उद्धवराव जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या कार्यातून तुम्ही सदैव स्मरणात राहाल'.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.