कोल्हापूर : जातीचे खोटे दाखले काढून उच्चभ्रू समाजातील काहीजणांनी निवडणुका लढवल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजकीय आरक्षणाच्या रक्षणासाठी आता एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल.
त्यासाठी ९ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असून, त्यामध्ये सर्व समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते डी. जी. भास्कर यांनी केले. यासंदर्भात आज बैठक घेण्यात आली. भास्कर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
Miraj Politics : महायुतीचा पॅटर्न की पुन्हा ‘एकला चलो रे’? मिरज तालुक्यात भाजपची कसोटीरिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजीव आवळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीला आरक्षणाची तरतूद करून दिली.
आज स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीचे खोटे दाखले काढून निवडणूक लढवली आहे व मूळ मागासवर्गीयांचे राजकीय अस्तित्व संपवण्याच्या दिशेने ते जात आहेत.
Miraj Music Cluster : मिरज संगीत नगरीचा विकास आता निश्चित; म्युझिक क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांकडे थेट पाठपुरावा करणार – पृथ्वीराज पाटीलयाला विरोध करण्यासाठी हा महामोर्चा आयोजित केला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे, अशी भूमिका सर्व वक्त्यांनी मांडली.