Maize Farming : इथेनॉलमुळे मका उत्पादनाला झळाळी; जिल्ह्यात लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल, संशोधित वाण, हमीभावाची शक्यता
esakal February 27, 2026 03:45 AM

गहू, भात पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्यात अनुवंशिकरीत्या मक्याची उत्पादनक्षमता जास्त आहे. जिल्ह्याचा विचार केला, तर मक्याचे आताचे क्षेत्र १८६ हेक्टर असून, उत्पादकता ५२१ टन आहे.

जिल्ह्याचा भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केला तर हे क्षेत्र तसे कमी आहे. ते वाढविण्यासाठी केंद्र, राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडील काही वर्षांत इथेनॉल निर्मितीसाठी मका ‘गेमचेंजर’ ठरत असल्यामुळे जिल्ह्यात मका वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, याचा आजपासून आढावा.  

मुळशीतील शेतकऱ्यांचे सेंद्रिय, विषमुक्त पिकांना प्राधान्य

कोल्हापूर  मक्याचा खाण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रात आणि जनावरांना चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांकडून मक्यासाठी हक्काची एक जागा शेतात ठेवली जाते. उसापासून जसे इथेनॉल तयार होते, तसे ते मक्यापासूनही होते.

यात मक्याचा ३० ते ५० टक्क्यांनी वापर इथेनॉलमध्ये वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी हळूहळू मका लागवडीकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात ऐन आवकेच्या हंगामात मका हमीभावाच्या टप्प्यात पोहोचू शकतो.

Agricultural News : द्राक्षशेतीचे भवितव्य धोक्यात! जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कृषी विभागाने व्यापक मोहीम राबवावी

त्यामुळे मका बाजारात पुन्हा झळाळी येण्याची चिन्हे आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अभ्यास करत, कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत, विविध संशोधित वाणांचा वापर करत हळूहळू मका पिकाकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत.

आजमितीला जिल्ह्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असून, उसाच्या आंतरपिकात मका घेतला जातो. मात्र, आंतरपिकाऐवजी पूर्ण शेतात मका घेण्याचे प्रमाण तसे तुलनेने कमी आहे. ते वाढविण्यासाठीच शेतकऱ्यांचे प्रबोधन सुरू आहे. 

बावड्यातील मका संशोधन प्रकल्पातर्फे संशोधन

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मका पैदास, कृषी कीटकशास्त्र, कृषी विद्याविभागाच्या सहयोगातून कसबा बावड्यातील संशोधन प्रकल्प सुरू आहे. यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या, अन्नद्रव्यास चांगला प्रतिसाद देणाऱ्या, जैविक-अजैविक घटकास अनुकूल असणाऱ्या संयुक्त अन् संकरित वाणांची निर्मिती केली जाते.

राष्ट्रीय पातळीवर संशोधित संयुक्त आणि संकरित वाणांचे अखिल भारतीय समन्वयीत चाचणी प्रयोग घेतले जातात. नव्याने संशोधित संयुक्त आणि संकरित वाणासाठी लाभदायक उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले जाते.

मक्यावरील खोड कीड तसेच इतर सामान्य किडीसाठी प्रतिकारक्षमता तपासणे आणि कीड नियंत्रणासाठी विविध उपायोजनांवर संशोधन सुरू असून, मक्यावर आधारित पीक पद्धती विकसित करणे सुरू आहे. 

‘मका पिकाचा प्रचार, प्रसार आणि लागवड शेतकऱ्यांनी करावी, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धुळे येथे प्रत्येकवर्षी
५०० एकर क्षेत्रांत मका पिकाच्या रब्बी, खरीप हंगामात ‘ट्रायल’ घेतल्या जातात. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, लुधियानातील भारतीय मका संशोधन संस्थेतर्फे शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- डॉ. सुहास भिंगारदेवे, सहाय्यक मका कृषिविद्यावेत्ता

हंगामनिहाय आकडेवारी (महाराष्ट्र)

हंगाम क्षेत्र (लाख हेक्टर) उत्पादकता (किलो/हेक्टरी)

खरीप ८.७३ २६.७

रब्बी ३.६३ ३.०५

उन्हाळी ०.५८ १.६४

एकूण १२.९५ २७.३०

खरीप ८.७३ २६.७

रब्बी ३.६३ ३.०५

उन्हाळी ०.५८ १.६४

एकूण १२.९५ २७.३०

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.