बिबट्यामुळे वाहतूकदार दहशतीत
esakal February 27, 2026 04:45 AM

बिबट्यामुळे वाहतूकदार दहशतीत
बोर्डी, ता. २६ (बातमीदार) ः तलासरी तालुक्याच्या झाईबोरी गावातील वाणिया पाडा येथे चिकूच्या बागेत बिबट्याचा वावर आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावला असला तरी जेरबंद करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
वनखात्याकडून या परिसरात नागरिकांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संध्याकाळी ५नंतर रहदारी बंद करण्यात आली आहे; पण या निर्णयामुळे बागायतदारांसह वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे चिकूची वाहतूक करणाऱ्यांनादेखील विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील बागायतदारांकडून केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.