पाच वर्षांच्या जीविकाकडून शिवरायांना अनोखी मानवंदना
esakal February 27, 2026 04:45 AM

ओतूर, ता. २६ ः शिवजयंतीच्या पावन दिनी ओतूर (ता. जुन्नर) येथील जीविका जयदीप डुंबरे या अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीने ओतूर ते किल्ले शिवनेरी असा सायकल प्रवास पूर्ण करत छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
इतक्या लहान वयात जीविकाने दाखवलेले धैर्य, चिकाटी आणि जिद्द प्रेरणादायी आहे. शिवरायांच्या जन्मभूमीकडे सायकल चालवत पोहोचणे हे तिच्यासाठी केवळ अंतर पार करणे नव्हते, तर तो स्वराज्याच्या प्रेरणेचा आणि संस्कारांचा प्रवास होता.
मार्गातील चढ-उतार, उन्हाची तीव्रता आणि थकवा यावर मात करत तिने ओतूर ते शिवनेरी हा प्रवास यशस्वीरीत्या २ तासांत पूर्ण केला. उपस्थित शिवभक्तांनी तिचे कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.