वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी महिला ब्रिगेडने धमाका केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वुमन्स टीम इंडियाने टी 20i मालिका जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडियाची ऑस्ट्रेलियात कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र त्यानंतर आता भारतावर एकदिवसीय मालिका गमावण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे भारतासाठी शुक्रवारी 27 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारा दुसरा एकदिवसीय सामना करो या मरो असा आहे.
टीम इंडिया टी 20 प्रमाणे 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये विजयी सलामी देण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर मंगळवारी 24 फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 215 धावांचं आव्हान हे 38.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ही मालिका जिंकण्याची संधी आहे. तर भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसरा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. अशात या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना कधी?टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी 27 फेब्रुवारीला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना कुठे?टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट इथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 8 वाजून 50 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.