बँक सुट्ट्या मार्च 2026 नवी दिल्ली: मार्च महिन्यात बँकेत तुम्ही एखाद्या कामानिमित्त जाणार असाल तर तुम्ही बँक कोणत्या दिवशी सुरु असेल, कोणत्या दिवशी सुट्टी आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे. उद्यापासून बँका वेगवेगळ्या कारणामुळं पाच बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळं तुम्ही बँकेत जायचं असल्यास मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घ्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात येते. त्याद्वारे बँका कोणत्या शहरात कोणत्या दिवशी बंद असतील हे समजतं.
फेब्रुवारीमधील चौथा शनिवार 28 फेब्रुवारीला आला आहे.त्यामुळं बँका 28 फेब्रुवारीला बंद असतील. यामुळं बँकांच्या शाखा देशभर बंद असतील. यानंतर 1 मार्च रविवारी असल्यानं बँका या दिवशी देखील बंद असतील. यामुळं ग्राहकांनी बँकांतील कामं आज म्हणजेत 27 फेब्रुवारी रोजी पूर्ण करुन घेणं आवश्यक आहे.
मार्च महिन्यात रविवारी 1 मार्च, 8 मार्च, 15 मार्च, 22 मार्च, 29 मार्चला बँकांना सुट्टी असेल. दुसरा शनिवार 14 मार्च आणि चौथा शनिवार 28 मार्चला असल्यानं बँकांना सुट्टी असेल.
28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला बँकांना सुट्टी असेल, त्यानंतर देशातील दोन शहरात बँका 2 मार्चला बंद असतील. कानपूर आणि लखनौमध्ये होलिका दहनानिमित्त बँकाना सुट्टी असेल. या दोन शहरांना वगळता देशात बँका सुरु राहतील आणि त्यांचं कामकाज सुरु असेल.
3 आणि 4 मार्चला काही शहरांमध्ये बँका बंद असतील. डोल जतरा, धुलिवंदन आणि होलिका दहन यामुळंभोपाळ, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि पाटणा या ठिकाणी बँका बंद असतील.
4 मार्चला होळीनिमित्त बँका बंद राहतील. अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगड, इम्फाळ, ईटानगर, जम्मू, कानपूर, लखनौ, नवी दिल्लीरायपूर यासह इतर शहरात बँका बंद राहतील.
13 मार्चला चापचर कुट सणानिमित्त आयजोलमध्ये बँका बंद असतील.
17 मार्चला शब-ए- कद्र निमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद असतील.
19 मार्चला गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्रासह 11 राज्यातील विविध शहरात बँकांना सुट्टी असेल.
20 मार्चला ईद-उल-फित्र आणि जुमात-उल- विदा निमित्त देशातील पाच राज्यात बँका बंद असतील.
26 मार्च आणि 27 मार्चला श्री रामनवमी विविध राज्यात बँका बंद असतील.
31 मार्चला महावीर जयंतीनिमित्त 15 राज्यांतील शहरात बँका बंद असतील.
दरम्यान, बँका बंद असल्या तरी नेट बँकिंगद्वारे व्यवहार पूर्ण करता येऊ शकतं. एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात.
आणखी वाचा