Kolhapur Cleaning Cmpaign : तरुण कार्यकर्ते आणि महापालिकेची संयुक्त कारवाई; प्लास्टिक व शेवाळ हटवत खण झाला स्वच्छ
esakal February 28, 2026 03:45 AM

कोल्हापूर : मंगेशकरनगर येथील ‘श्री गणेश विहार खण’ ही मंगळवार पेठ, भागाच्या सौंदर्यात भर घालते. पाण्याचे स्रोत जपवणूक करण्याचा निर्धार करत भागातील तालीम मंडळासह तरुण कार्यकर्ते, सामाजिक संस्था, महापालिका पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसह ‘सकाळ’ माध्यम समूहाने खणीची स्वच्छता करून परिसर चकाचक केला.

कालपासूनच (ता. २१) महापालिका कर्मचाऱ्यांनी व भागातील तरुण कार्यकर्त्यांनी येथील स्वच्छतेस सुरुवात केली. आज सकाळी भागातील नगरसेवक, महापालिकेचे उपायुक्त, पदाधिकारी, कर्मचारी, कोल्हापूर अर्थ वॉरिअर, तुकाराम माळी तालीम मंडळ, साठमारी फ्रेंडस् सर्कल, निसर्ग मित्रांसह मान्यवर नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली.

Kolhapur City : १५० फूट खोल विहिरीत कोसळलेले झाड क्रेनने बाहेर; जीवावर उदार होऊन पार पडली धाडसी स्वच्छता मोहीम!

खणीतील प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, पालापाचोळा असा ट्रॉलीहून अधिक कचरा संकलित केला. दोन तास हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर थेट उपायुक्त परितोष कंकाळ हे दहाच्या सुमारास बोट घेऊन आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी पाण्यावर साचलेले शेवाळ काढून खण स्वच्छ केली.

गणेश विहार खण आणि त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे हे भागातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. ‘सकाळ’ने पुढाकार घेऊन राबवलेली स्वच्छता मोहीम कौतुकास्पद आहे. साठमारी फ्रेंडस् सर्कलच्या माध्यमातून तरुणांना अशा मोहिमा राबविण्यास प्रोत्साहित करू.

- संजय पायमल, साठमारी फ्रेंडस् सर्कल

Kolhapur Muncipal : महापालिकेतर्फे शुक्रवारी स्वच्छता मोहीम; महापौर रूपाराणी निकम, ‘सकाळ’च्या ‘जलतीर्थ स्वच्छता’ मोहिमेचा पुढील टप्पा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.