-rat२६p१७.jpg-
२६O२७३७४
पावस ः पूर्णगड शाळेतील विद्यार्थ्यांनी पूर्णगड किल्ला येथे क्षेत्रीय भेट दिली.
-----
पूर्णगड किल्ल्याची स्वच्छता
विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट ; गौरव गीताचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २७ ः तालुक्यातील पूर्णगड शाळेचे वनभोजन व परिसर भेट उपक्रमातंर्गत पूर्णगड किल्ला येथे भेट देण्यात आली. पूर्णगड किल्ल्याची स्वच्छता करून, पूर्णगड परिसरातील विविध वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पूर्णगड किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे गीत गायन करण्यात आले. मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी राज्यभाषेचा गौरव गाणारे गीत आकर्षक वेशभूषा करून सादर करण्यात आले. याप्रसंगी रॅली काढून मराठी भाषा गौरव संदेश देणारे फलक दाखवून लोकजागृती कार्यात आली. विविध खेळ, शब्द भेंड्या, गाणी, पारंपरिक शिमग्यातील गाणी यांचे कृतीसह गायन करण्यात आले.
या उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा सहभाग होता. मुलांना आनंददायी, परिसराला अनुसरून असे विविध अध्ययन अनुभव देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी स्नेहभोजन केले. उपक्रम यशस्वितेसाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, तृप्ती शिरगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.