पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सध्या वाहतूक नियमांचा अक्षरश: धुराळा उडवला जात आहे. डंपर, ट्रक आणि मिक्सरद्वारे वाळू, खडी, राडारोडा, डांबर व ऑईलची उघड्यावर आणि क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सर्रास सुरू आहे.
त्यामुळे उडणाऱ्या धुळीचा प्रचंड धुरळा आणि वाहनांचा धूर नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. त्यामुुळे वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषणाची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. मात्र ही गंभीर समस्या असतानाही पोलिस, आरटीओ, महापालिका कारवाईऐवजी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
धूलिकणांचा मारा; श्वसनरोगांचा धोकाशहरातील अनेक भागांमध्ये बांधकाम साहित्य वाहून नेणारे डंपर आणि काँक्रीट मिक्सर झाकणाविना फिरताना दिसतात. रस्त्यावरून उडणारी धूळ थेट नागरिकांच्या श्वासात जात आहे. वाढत्या धुरळ्यात आणि कर्कश आवाजात शहराचा श्वास गुदमरत आहे. त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. बांधकाम साहित्याची उघडी वाहतूक आणि धूळ नियंत्रण न केल्याने प्रदूषण वाढत आहे.
प्रदूषणाचे कारणडंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर, ट्रेलर ही शहरातील हवा, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाची मोठी कारणे मानली जातात.
बांधकाम साहित्याची वाहतूक, खराब इंजिन, उघड्या ट्रकमधून होणारी धूळ आणि नियमांचे उल्लंघन यामुळे शहरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढते.
अवजड वाहनांचा परिणाम वायू प्रदूषणअवजड वाहनांमध्ये प्रामुख्याने डिझेल इंजिन असतात. या इंजिनमधून कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड घातक वायू उत्सर्जित होतात. हे सूक्ष्म कण हवेत मिसळून श्वसनाचे आजार, दमा, हृदयविकार आणि फुफ्फुसांचे आजार वाढवतात.
धूळ प्रदूषणबांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या डंपर-ट्रकमधून मोठ्या प्रमाणात धूळ उडते.
कारणे : वाळू, सिमेंट, मुरूम, राडारोडा उघड्या वाहनांमध्ये वाहतूक.
रस्त्यावर सांडलेले बांधकाम साहित्य
वाहनांच्या चाकांमुळे उडणारी धूळ
अवजड वाहनांमुळे मोठा आवाज निर्माण होतो. यामुळे शहरी भागात नागरिकांना मानसिक ताण, झोपेचे विकार आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
रस्ते प्रदूषण व कचरा
ट्रक-डंपरमधून रस्त्यांवर वाळू, माती, सिमेंटची धूळ
यामुळे पर्यावरणीय नुकसान होते.
या भागांत धावतात अवजड वाहनेहिंजवडी, वाकड, बावधन, रावेत, पुनावळे, ताथवडे, चिखली, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, आळंदी या भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. तसेच ‘आरएमसी प्लांट’देखील सुरू आहेत. त्यामुळे या भागांत मोठ्या प्रमाणात अवजड वाहने धावत असतात.
ओव्हरलोड डंपर; अपघातांचा धोका१ अनेक डंपर, मिक्सर आणि ट्रक क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेत असल्याने ब्रेक निकामी होणे, रस्त्यावर खडी-वाळू सांडणे, तेलगळती होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. रस्त्यावर सांडलेली खडी किंवा ऑईलमुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असतानाही नियमभंग करणाऱ्या अवजड वाहनचालकांवर पोलिस आणि आरटीओ विभागाकडून सातत्याने कठोर कारवाई होताना दिसून येत नाही.
वेळेच्या मर्यादेचेही उल्लंघन२ तळवडे, देहूगाव, चिखली, आकुर्डी, भोसरी, वाकड, हिंजवडी, बालेवाडी, सांगवी, ताथवडे, बावधन, पिंपरी, देहूरोड, चाकण या भागांतील काही मार्गांवर सकाळी आठ ते दुपारी बारा तसेच सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीही वेळेचे पालन न करता ही अवजड वाहने कधीही धावत असतात.
Raigad News : पालीत डंपर अपघाताने खळबळ; फाळक्याची कडी तुटून बाईकस्वार गंभीर जखमी; अवजड वाहतुकीचा धोका पुन्हा समोर! कोणाचे अभय?३ पिंपरी चिंचवडमध्ये बांधकामांची संख्या वाढली तशी साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांचेही प्रमाण वाढले. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका व पोलिसांनी घालून दिलेले कोणतेही नियम या वाहनांकडून पाळले जात नाहीत. बांधकामाचा राडारोडा, वाळू, सिमेंट यांसारख्या कच्चा मालाची वाहतूक बिनबोभाट केली जाते. बांधकामांच्या ठिकाणचा चिखल या वाहनांच्या चाकांना चिकटून तो रस्त्यांवर पसरतो. पर्यायाने इतर वाहनांचे अपघात होतात. शिवाय, चिखल सुकून ती माती रस्त्यावर पसरते. या वाहनचालकांवर महापालिका कारवाई करते. मात्र, नियम न पाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली जात नाही.