-rat२७p११.jpg-
२६O२७५२३
संगमेश्वर ः डिंगणी रस्त्याची झालेली दुर्दशा.
---------
रस्ता नाही, धोक्याचा सापळा
डिंगणी मार्गाची दयनीय अवस्था; ग्रामस्थ त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः तालुक्यातील डिंगणी–फुणगूस–गणपतीपुळे खाडी समांतर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डिंगणी, करजुवे, माखजन तसेच खाडीपट्ट्यातील विविध वाड्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, सध्या तो प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे.
वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या सततच्या हालचालींमुळे या शांत गावांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यातच अलीकडे गॅस पाइपलाइनसाठी करण्यात आलेल्या उत्खननामुळे रस्त्यावर मातीचे ढिगारे साचले असून, रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. परिणामी, वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. येथील रस्त्याच्या साईडपट्ट्या अत्यंत धोकादायक बनल्या असून, काही ठिकाणी खोल खड्डे आणि ढासळलेली कड दिसून येत आहे. संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, उत्खननानंतर योग्य पद्धतीने मुरूम टाकून मार्ग सुस्थितीत आणावा, तसेच साईडपट्ट्या सुरक्षित कराव्यात, अशी मागणी केली आहे.