Google वर 'Punch the Monkey' सर्च केलंत का? क्यूट सरप्राइज पाहून हसू आवरणार नाही
esakal February 28, 2026 08:45 AM

Google Joins the Punch Monkey Trend: तुम्ही Google वर ‘Punch the Monkey’ सर्च करून पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘पंच’ या लहान माकडाच्या लोकप्रियतेत आता Google नेही सहभाग घेतला आहे. ‘Punch the Monkey’ असे शब्द टाइप करताच स्क्रीनवर हृदयाच्या आकाराचे पंच स्टिकर्स पडताना दिसतात. हा छोटासा पण खूप गोड अनुभव सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

जगात माकडांच्या अनेक प्रजाती असल्या, तरी सध्या सर्वांचे लक्ष जपानमधील ‘पंच’ या छोट्याशा माकडाकडे लागले आहे. सोशल मीडियावर पंचचे फोटो, व्हिडीओ आणि त्याच्याशी संबंधित अपडेट्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. पंचला प्रत्यक्ष पाहण्यासाठी अनेक जण जपानमधील Ichikawa City Zoo येथे भेट देत आहेत.

हा ट्रेंड नक्की आहे तरी काय आणि तुम्ही कसा ट्राय करू शकता ते जाणून घेऊया.

कोण आहे 'पंच'?

पंच हा सहा महिन्यांचा जपानी माकड आहे. त्याची आई त्याला सोडून गेल्यानंतर प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याची काळजी घेतली. त्यानंतर त्याला इतर माकडांच्या गटात सामील करण्यात आले; परंतु सुरुवातीला त्याला गटाकडून त्रास सहन करावा लागला. यामुळे पंचची कहाणी जगभर प्रसिद्ध झाली.

आईपासून वेगळे झाल्यानंतर पंच एका माकडाच्या बाहुलीला घट्ट पकडून बसल्याचे अनेक व्हिडीओंमध्ये दिसले. या दृश्यांनी अनेक नेटिझन्स भावूक झाले आणि त्यांनी पंचबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

'Punch The Monkey' Google Search Trend Goes Viral

कसा ट्राय करायचा गुगलचा ट्रेंड?

पंचबद्दल सुरू असलेल्या चर्चेत आणि प्रेमात आता Google देखील सहभागी झालं आहे. या लहान माकडासाठी आपुलकी व्यक्त करण्यासाठी Google ने एक गोड आणि मजेशीर सरप्राईज दिलं आहे. Google वर ‘Punch the Monkey’ असे शब्द टाइप करताच स्क्रीनवर हृदयाच्या आकाराचे पंच स्टिकर्स वरुन खाली पडताना दिसतात. हा अनुभव लोकांना खूप आवडत असून, अनेक जण हा मजेशीर सर्च पुन्हा पुन्हा करत आहेत. त्यामुळे ‘Punch the Monkey’ सर्च सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

परिस्थितीत बदल

सुरुवातीला त्रास देणारेव्हिडीओ समोर येत होते; पण हळूहळू परिस्थितीत बदल दिसू लागला. काही व्हिडीओंमध्ये पंचला इतर माकडांकडून मिठी मिळताना, तर कधी त्याची स्वच्छता करताना दिसले. तरीही, कधी प्रेम तर कधी संघर्ष, असा पंचचा प्रवास सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.