Video : राकेशने तन्वीला किस केल्यावर राखीचं धक्कादायक कृत्य ! "काय मूर्खपणा.." प्रेक्षक वैतागले
esakal February 28, 2026 08:45 AM

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दररोज नवीन ड्रामा पाहायला मिळतोय. राखी सावंतने बिग बॉस मराठीचे दोन आठवडे गाजवले आहेत. त्यातच आता तिने केलेल्या कृतीमुळे सगळेचजण हादरले आहेत.

सध्या राखी राकेश बापटच्या प्रेमात पडली आहे. ती सतत त्याच्या मागे फिरते. पण राकेश तिला अजिबात प्रतिक्रिया देत नाहीये. त्यातच राकेश आणि तन्वीच्या कृतीमुळे राखी चिडली आणि तिने धक्कादायक कृती केली.

प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, एका टास्कदरम्यान राकेशने तन्वीसोबत डान्स केला. या डान्सदरम्यान त्याने तन्वीच्या गालावर किस केलं. हे पाहून राखी चिडली आणि खूप दुःखी झाली. तिने स्वतःचे केसच कापले. तिला तन्वी आणि राकेश अडवण्याचा प्रयत्न करत होते पण ती ऐकली नाही. सोशल मीडियावर हा प्रोमो गाजतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)