India vs West Indies Semi-Final Qualification Scenario: शनिवारी (२८ फेब्रुवारी) टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सुपर - ८ फेरीत पाकिस्तानने श्रीलंकेला ५ धावांनी पराभूत केले. पाल्लेकेले येथे झालेल्या सामन्यात जरी पाकिस्तानने विजय मिळवला असला, तरी त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
पाकिस्तानपेक्षा चांगला नेट रन रेट असल्याने न्यूझीलंडला सेमीफायनलचे तिकीट मिळाले. न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये (New Zealand Qualify for Semifinal) जाणारा तिसरा संघ ठरला.
T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूतसुपर-८ फेरीत दुसऱ्या गटात इंग्लंडने तिन्ही सामने जिंकल्याने ६ गुणांसह पहिला क्रमांक मिळवला आणि सेमीफायनल गाठली आहे. याच गटातून श्रीलंका पहिल्या दोन सामने पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडले होते. पण पाकिस्तान आणि न्यूझीलंड शर्यतीत होते.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-८ चा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण नंतर न्यूझीलंडने श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केले. तसेच इंग्लंडविरुद्धही शेवटच्या क्षणी पराभव स्वीकारला. त्यामुळे त्यांचे ३ गुण होते.
पाकिस्तानला मात्र इंग्लंडविरुद्ध मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध त्यांनी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानचेही ३ गुण झाले. मात्र न्यूझीलंडचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला असल्याने न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला, तर पाकिस्तानचे आव्हान संपले.
याशिवाय पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. परंतु, या गटातील झिम्बाब्वेचे आव्हान सलग दोन पराभवांमुळे संपुष्टात आले.
त्यामुळे सध्या तरी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या तीन संघांचे सेमीफायनलमधील स्थान पक्के झाले असले तरी शेवटच्या जागेसाठी पहिल्या गटात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शर्यत आहे. या दोन संघात रविवारी (१ मार्च) होणारा सामनाच सेमीफायनलमध्ये कोण जाणार हे ठरवणार आहे.
शेवटच्या तिकीटासाठी शर्यतकोलकाताच्या इडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात एकप्रकारे उपांत्यपूर्व सामनाच रंगणार आहे. कारण या सामन्यात विजय मिळणारा संघ सेमीफायनल खेळेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान इथेच संपेल.
सध्या सुपर-८ मध्ये दोन्ही संघांनी एक विजय आणि एक पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी २ गुण आहेत. अशात विजय मिळणाऱ्या संघाचे ४ गुण होतील, त्यामुळे तो संघ सेमीफायनलमध्ये पोहचेल.
PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...मात्र, जर पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणाने हा सामना रद्द झाला, तर मात्र वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि भारताचे आव्हान संपेल. कारण वेस्ट इंडिजचा नेट रन रेट भारतापेक्षा चांगला आहे. वेस्ट इंडिजचा नेट रन रेट + १.७९१ आहे, तर भारताचा नेट रन रेट - ०.१०० आहे.