Iran-Israel War: युद्धस्थितीमुळे इंग्लंड पाकिस्तान सामना रद्द, हॉटेलमध्ये थांबवण्याची आली वेळ
GH News March 01, 2026 07:11 PM

England Lions vs Pakistan Shaheens: पाकिस्तान शाहीन आणि इंग्लंड लायन्स यांच्यात अनऑफिशियल पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान शाहीनला 9 विकेटने पराभूत केलं होत. यात पाकिस्तानने शाहीनने प्रथम फलंदाजी करताना 152 धावा केल्या होत्या. हे आव्हान इंग्लंड लायन्स सहज गाठलं होतं. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्याची तयारी सुरू होती. हा सामना 1 मार्च रोजी आबुधाबीच्या ओव्हल स्टेडियममध्ये खेळला जाणार होता. पण आखाती देशातील युद्धस्थिती पाहता हा सामना रद्द करण्यात आला. वाढता तणाव आणि कधी काय होईल सांगता येत नाही? अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. अमेरिका-इस्राईलकडून इराण हल्ले केले जात आहेत. त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणही हल्ले करत आहे. त्याचा परिणाम युएईसह संपूर्ण आखाती देशांवर झाला आहे.

इंग्लंड पाकिस्तान सामना रद्द

दुबई आणि आबुधाबीत हल्ले झाल्याने खळबळ उडाली आहे. विमानसेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या सल्ल्यानुसार हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. ईसीबीने स्पष्ट केलं की, संघ आणि व्यवस्थापनचाी सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघाच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला हॉटेलमध्ये थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकंच काय तर सराव शिबिरही झालं नाही. आता हे युद्ध निवळतं की पेटतं हे काही सांगता येत नाही. त्यामुळे विमानसेवा सुरू होताच खेळाडूंना मायदेशी बोलवलं जाण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा हा दौरा 9 मार्चला संपणार होता. मात्र आता लवकरच मायदेशी परतणार असल्याचं दिसत आहे.

इंग्लंडने लायन्स यापूर्वी 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत पाकिस्तान लायन्सला 3-0 ने मात दिली होती. दुसरीकडे, इंग्लंड महिला संघाचा आबुधाबीत होणारं सराव शिबीर पोस्टपोन केलं आहे. तसेच युएईत होणाऱ्या अफगाणिस्तान श्रीलंका टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेवरही या परिणाम होण्याची शक्यता आहे. ही मालिका 13 मार्चपासून सुरू होणार आहे. पण दोन्ही बोर्ड सुरक्षेला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या युद्धाचा परिणाम आता इतर गोष्टींवरही दिसू लागला आहे. आता पुढे काय होत? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.