अनगरच्या पाटील प्रशालेत विज्ञानदिन साजरा
esakal March 01, 2026 08:45 PM

ANR26B02902
अनगर (ता. मोहोळ) : येथील पाटील प्रशालेत विज्ञानदिनी विज्ञान ऑलिंपियाडमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देताना मान्यवर.
---
अनगर प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
अनगर : येथील (कै.) शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञानदिन साजरा झाला. परमेश्वर थिटे यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्याविषयी व त्यांच्या प्रयोगाविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी विज्ञान ऑलिंपियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा परमेश्वर थिटे व प्राचार्य महादेव चोपडे यांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले यांनी विज्ञान जाणीव- जागृतीविषयी माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर थिटे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हनुमंत गुंड यांनी सूत्रसंचालन केले. माधव खरात यांनी आभार मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.