MP Holi Tradition: या गावात होळीला का खेळला जात नाही रंग? भगवान श्रीकृष्ण आणि भक्त प्रल्हादाशी आहे थेट संबंध, हे आहे भावुक कारण
esakal March 01, 2026 08:45 PM

होळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते रंग, गुलाल आणि उत्साहाचं वातावरण. पण मध्य प्रदेशात एक असं गाव आहे, जिथे होळीच्या दिवशी रंगांचा थेंबही उडवला जात नाही. हे गाव रंगांपासून लांब राहून चक्क माणुसकीची आणि सहवेदनेची 'होळी' साजरी करतं.

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात 'चोली' नावाचं एक गाव आहे. या गावाला 'देवगड' असंही म्हणतात. विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात होळीच्या दिवशी कोणाच्याही अंगावर रंग पडत नाही. संपूर्ण गावात एक वेगळीच शांतता असते. पण ही शांतता कोणत्याही भीतीपोटी नाही, तर एका महान परंपरेपोटी आहे.

Premium|Color science: रंगांचे शास्त्रीय आणि सांस्कृतिक महत्त्व; अंतर्मुख करणारा प्रवास दुसऱ्याच्या दु:खात सहभागी होण्याची अनोखी रीत

या गावात होळी न खेळण्यामागे एक अत्यंत भावूक कारण आहे. गावातल्या पूर्वजांनी ही परंपरा सुरू केली होती. होळीच्या दिवशी गावातील लोक सर्वात आधी अशा कुटुंबांच्या घरी जातात, ज्यांच्या घरी गेल्या वर्षभरात कोणाचा मृत्यू झाला आहे.

गावकरी या दु:खी कुटुंबांना भेटतात, त्यांना गुलाल लावून सांत्वना देतात आणि त्यांच्या दु:खात सहभागी होतात. जोपर्यंत ज्यांच्या घरी शोक आहे त्यांचं मन हलकं होत नाही, तोपर्यंत गावकरी आनंद साजरा करत नाहीत.

जेव्हा ही दु:खी कुटुंबं सावरतात आणि समाजात मिसळतात, तेव्हा त्याच्या पुढच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात रंगांची होळी खेळतं.

होळीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा कशी सुरू झाली? जेव्हा रंग नव्हते तेव्हा हा सण कसा साजरा करायचे? भगवान कृष्ण आणि भक्त प्रल्हादाशी संबंध

चोली गाव हे आपल्या प्राचीन सिद्ध मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. होळीचा हा सण भगवान विष्णूचा भक्त प्रल्हाद आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी जोडलेला आहे. देशभरात ४ मार्चला होळी साजरी होणार असली, तरी या गावात मात्र खऱ्या अर्थाने माणुसकी जपल्यानंतरच रंगांचा उत्सव सुरू होतो. माणुसकीचा आणि सहवेदनेचा हा वारसा चोली गावातील लोक पिढ्यानपिढ्या जपत आहेत. रंगांपेक्षा नात्यांची गुंफण कशी महत्त्वाची असते, हेच या परंपरेतून दिसून येते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.