Iran Israel War : इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाग्नी भडकला आहे. दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली असून इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांत इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांनी मिळून केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. आपला सर्वोच्च नेताच मारला गेल्यानंतर इराणमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. यासह आता आम्हीही इस्रायल, अमेरिका यांना प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणने दिलेला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी पेटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरेल अशी धमकी इराणला दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियाव खात्यावर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर जगात खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट शब्दांत इराणला इशारा दिला आहे. ‘आज आम्ही आणखी ताकदीने हल्ला करू, हा हल्ला सर्वात शक्तीशाली असेल असा इशारा इराणने दिलेला आहे. परंतु इराणने असे कोणतेही पाऊल उचलू नये. कारण त्यांनी हल्ले केले तर आम्हीही त्यांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ. आतापर्यंत कधीही न केलेला शक्तीशाली हल्ला आण्ही करू,’ असा रोखठोक इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर आता इराण नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर