IND vs WI : अभिषेक शर्मा पुन्हा एकदा फूसss! महत्त्वाच्या सामन्यात 10 केल्या आणि 6 धावांचं नुकसान
GH News March 02, 2026 12:13 AM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील करो या मरोचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. याचा पुरेपूर फायदा वेस्ट इंडिजच्या संघाने घेतला आणि 20 षटकात 4 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात आली होती. इतका मोठा स्कोअर असताना चांगल्या सुरूवातीची गरज होती. त्यामुळे अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा होत्या. त्याची बॅट झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात चालली होती. पण त्याने पुन्हा एकदा निराशा केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात फेल गेला.

अभिषेक शर्माने 11 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 10 धावा केल्या आणि बाद झाला. अकिल होसेनच्या चेंडूवर जोरात फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्याचा झेल पकडताना शिमरोन हेटमायरने कोणतीच चूक केली नाही. अभिषेक शर्माने या सामन्यात काय केलं? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्याचं या सामन्यातील बेरीज वजाबाकी केली तर त्याने या सामन्यात भारताचं 6 धावांचं नुकसान केल्याचं दिसून आलं. त्याने रोस्टन चेसचा झेल सोडला होता. त्यानंतर रोस्टन चेसने या जीवदानाचा फायदा घेत अजून 16 धावा केल्या. तर अभिषेक शर्मा जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा त्याने फक्त 10 धावांची खेळी केली. त्यामुळे अधिक वजाबाकी करता भारताचं 6 धावांचं नुकसान केलं आहे.

अभिषेक शर्मा या स्पर्धेत पूर्णपणे फेल गेल्याचं दिसून आलं आहे. या स्पर्धेतील सुरूवातीच्या 3 सामन्यात तर त्याला खातंही खोलता आलं नाही. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याला भोपळा मिळाला. त्यानंतर सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 12 चेंडूत 15 धावा केल्या. तर झिम्बाब्वेविरुद्ध 30 चेंडूत 55 धावांची खेळी केली होती. आता त्याच्याकडून तशाच कामगिरी अपेक्षा होती. पण त्याने चाहत्यांना पुन्हा एकदा निराश केलं. फक्त 10 धावा करून तंबूत गेला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.