IND vs WI : संजूची मॅचविनंग खेळी, टीम इंडिया सेमी फायनलमध्ये, विंडीजचा 5 विकेट्सने धुव्वा
Tv9 Marathi March 02, 2026 02:45 AM

ओपनर संजू सॅमसन याने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियासमोर या स्पर्धेत सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचं आव्हान होतं. वेस्ट इंडिजने भारतासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 4 बॉलआधी आणि 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने संजू सॅमसन याने केलेल्या नाबाद आणि धमाकेदार खेळीच्या जोरावर हे आव्हान पूर्ण केलं. भारताने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. टीम इंडियाचा हा सुपर 8 मधील दुसरा तर साखळी फेरीसह एकूण पाचवा विजय ठरला. इंडिया यासह सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली.  तर पराभवासह वेस्ट इंडिजचं स्पर्धेतून पॅकअप झालं आहे.

सामन्यात काय झालं?

टीम इंडियाने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विंडीजला झटका दिले. मात्र जेसन होल्डर आणि रोव्हमॅन पॉवेल या जोडीने विंडीजसाठी निर्णायक सामन्यात मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात निर्णायक योगदान दिलं. जेसन होल्डर आणि रोव्हमॅन पॉवेल या जोडीने पाचव्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये नॉट आऊट 76 रन्सची पार्टनरशीप केली. विंडीजने या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 195 रन्स केल्या. रोवमॅन 34 आणि जेसनने 37 रन्स केल्या. तर टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

त्यानंतर संजूने केलेल्या चाबूक खेळीमुळे भारताने हा सामना कोणत्याही अडचणींशिवाय जिंकला. संजूने नॉट आऊट 97 रन्स खेळी केली.   संजू व्यतिरिक्त या सामन्यात टीम इंडियाच्या विजयात इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. मात्र संजू टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला.

टीम इंडियाची बॅटिंग

अभिषेक शर्मा आणि इशान किशन या दोघांनी प्रत्येकी 10 धावा जोडल्या. सूर्याने 18 आणि तर हार्दिकने 17 धावा केल्या. तिलक वर्मा याने संजूला साथ देत निर्णायक 27 धावांची खेळी साकारली. तर शिवम दुबे याने अखेरच्या क्षणी 2 चौकार लगावून नाबाद 8 धावा केल्या आणि संजूसह नाबाद परतला. संजूने 50 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 12 फोरसह नॉट आऊट 97 रन्स केल्या. तर विंडीजसाठी जेसन होल्डर आणि शामर जोसेफ या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिलवल्या. तर अकील होसेन याने 1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.