टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने दणदणीत असा विजय मिळवला आहे. भारताला वेस्ट इंडिजकडून 196 धावांचं आव्हान मिळालं होतं. भारताने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 19.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारतीय संघाने यासह सलग तिसऱ्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. तसेच टीम इंडियाने या विजयासह काही खास कामगिरीही केली आहे.
भारताचा कोलकातातील आठवा विजय
टीम इंडियाचा हा कोलकातातील 9 टी 20i सामन्यांमधील आठवा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने याच मैदानात विंडीज विरुद्ध अजिंक्य राहत सलग आणि एकूण पाचवा टी 20i विजय साकारला. तसेच इंडिया या वर्ल्ड कप स्पर्धेत इडन गार्डन्समध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना सामना जिंकणारी दुसरी टीम ठरली.
संजू सॅमसन टीम इंडियाच्या विजयाचा हिरोटीम इंडियाचा ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन हा या विजयाचा खरा हिरो ठरला. ओपनिंगला आलेल्या या संजूने नाबाद राहत भारताला विजयी केलं. संजूने टीम इंडियासाठी या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या.
संजूला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी काही सामन्यांत धावांसाठी फार संघर्ष करावा लागला होता. संजू न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत सुपर फ्लॉप ठरला. संजू टी 20i वर्ल्ड कप मोहिमेचा भाग होता. मात्र या निराशाजनक कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंटने ऐन क्षणी प्लान बदलला. संजुला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यातही बॅटिंगची संधी देण्यात आली नाही. संजूला अशाप्रकारे अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं म्हटलं गेलं.
संजूला या दरम्यानच्या काळात प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. संजूला सोशल मीडियावरुन प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मात्र संजूने या टीकेकडे लक्ष दिलं नाही. संजूने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतली. संजूने तोंडाने उत्तर देण्याऐवजी बॅटने उत्तर देण्याचं ठरवलं आणि तसं करुनही दाखवलं.
संजूला डच्चू, इशानला प्राधान्यनिराशाजनक कामगिरीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संजूच्या जागी ऐन क्षणी इशान किशन याला ओपनर म्हणून संधी देण्यात आली. त्यामुळे संजूचा प्लेइंग ईलेव्हनमधून पत्ता कट झाला. तसेच टीम मॅनेजमेंटने अनुभवी संजूला प्राधान्य न देता अभिषेक शर्मा याच्यावर प्रचंड विश्वास दाखवला. अभिषेक साखळी फेरीत सलग 3 सामन्यांत झिरोवर आऊट होऊनही टीम मॅनेजमेंटने त्याला वारंवार संधी दिली. मात्र संजूबाबत विचारही केला नाही. मात्र संजूने मेहनतीच्या जोरावर चित्र बदललं आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर विंडीज विरुद्ध मॅचविनिंग खेळी साकारली.
संजूची विंडीज विरुद्धची कामगिरीसंजूने वेस्ट इंडिज विरुद्ध 194 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या संजूने 50 बॉलमध्ये नॉट आऊट 97 रन्स केल्या. संजूने या खेळीत 4 सिक्स आणि 12 फोर लगावले. संजूला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.