स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
मुलुंड, ता. १ (बातमीदार) : विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भांडुप (पूर्व) येथील सावरकर मार्गावरील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
कामगार नेते बाबा कदम आणि नगरसेवक दीपक सावंत यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी तानाजी मोरे, रवींद्र महाडिक, लीना मांडलेकर, कमलाकर पवार, प्रमोद दळवी, संदीप बागडे आदी सावरकरप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमात सावरकरांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला.