Tuljapur Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! चिमुकलीचा खून, तुकडे करून पुरले, तुळजापूर तालुक्यात चुलत्याचे कृत्य..
esakal March 02, 2026 04:45 AM

धाराशिव: गवळेवाडी (ता. तुळजापूर) येथे तेरा महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चुलत्यानेच तिचा गळा दाबून खून केला, मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून जमिनीत पुरल्याचे उघडकीस आले. तामलवाडी पोलिसांनी २४ तासांत संशयित चुलत्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Akola Accident: तेल्हारा शेरी फाट्यावर भीषण अपघात; माळेगावच्या तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू, आयशर अन् दुचाकीची समाेरासमाेर धडक!

याप्रकरणी महादेव माने (रा. गवळेवाडी) यांनी शनिवारी (ता.२८) तामलवाडी (ता. तुळजापूर) पोलिस ठाण्यात तक्रार दिलेल्या तक्रातीत आपल्या तेरा महिन्यांच्या मुलीला घरातून पळवून नेल्याचे म्हटले होते. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुलीचा चुलता शंकरेश्वर माने याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शुक्रवारी (ता.२७) पहाटे पाचच्या सुमारास त्याने चिमुकलीला घरातून उचलून नेले. शेतात नेऊन तिचा गळा दाबून खून केला, कोयत्याने मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले व चारीमध्ये पुरले. त्याने दाखवलेल्या जागेवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफाकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोकुळ ठाकूर, हवालदार जुबेर काझी, आकाश सुरनर, नितीन भोसले, सूरज नरवडे, नझीर बागवान, उमेश माने, तुराब शेख आणि मनोज गोबाडे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गात बदल निश्चित! सोलापूर जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी सांगितला कसा असेल बदल.. संशयावरून पाशवी कृत्य

प्राथमिक तपासात या हत्येमागील कारण अत्यंत संतापजनक असल्याचे समोर आले आहे. आरोपी शंकरेश्वर याला आपल्या भावाच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून रागाच्या भरात त्याने हे पाशवी कृत्य केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.