देहूरोड, ता. १ : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची परंपरा, युद्धनीती आणि ऐतिहासिक शस्त्रसंपदेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने एम.डी.फाउंडेशनतर्फे शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनाला मान्यवर, उद्योजक, इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमी तसेच तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेशी जोडलेल्या बांधवांची मोठी उपस्थिती लाभली. या उपक्रमामुळे शिवकालीन इतिहासाचा जागर घडत असून तरुण पिढीला आपल्या गौरवशाली परंपरेची ओळख होत आहे, अशी माहिती इतिहास संशोधक रवींद्र जगदाळे यांनी दिली. एम. डी. फाउंडेशनच्या संस्थापिका मृणाल देशमुख यांनी संयोजन केले.