खंडाळा - असवली विद्यालयाचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परिक्षेत यश
esakal March 02, 2026 02:46 PM

असवलीच्या ३५ विद्यार्थ्यांचे
एनएमएमएस परीक्षेत यश


खंडाळा, ता. १ : असवली (ता. खंडाळा) येथील पूज्य बापूजी साळुंखे विद्यालयातील इयत्ता आठवीच्या ३५ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत यश प्राप्त केले.

विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना संत शिक्षण संस्था व विद्यालयाकडून भेटवस्तू व गुणपत्रक देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक दत्तात्रय गुरव, विभागप्रमुख श्री. सूर्यवंशी, शिक्षक उपस्थित होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी कौतुक केले. विद्यालयाने या यशाची परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
----
06020
असवली ः यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना दत्तात्रय गुरव. त्या वेळी शिक्षक.
...................................

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.