नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू झलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतात सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेवर याचा थेट परिणाम होणार नसला तरी स्पर्धेशी संबंधित असलेल्यांच्या दुबईमार्गे परतीच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था करण्यास आयसीसीने विचार सुरू केला आहे.
पश्चिम आशायातील युद्धाचा स्पर्धेच्या आयोजनावर थेट परिणाम होत नसला तरी खेळाडू, संघ व्यवस्थापन, सामनाधिकारी, प्रसारण पथके आणि स्पर्धा कर्मचारी यांसह मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर आपल्या देशात परतण्यासाठी गल्फमधील हब विमानतळांवर, विशेषतः दुबईमार्गे परततात, त्यामुळे आयसीसीने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
स्पर्धेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता ही आयसीची प्राथमिकता आहे. त्यांचा प्रवास आणि निवास व्यवस्थित व्हावा, यासाठी आम्ही सुरक्षा पथकांना अगोदरच याची कल्पना दिली आहे. विनाअडथळा संबंधितांना त्यांच्या घरी परतता यावे, याची उपाययोजना आणि पर्यात तयार करण्यास आम्ही सुरुवात केली आहे, असे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले.
T20 World Cup: पाकिस्तानचा बहिष्कार तरी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार; जाणून घ्या त्यामागचं गणितआयसीसीचे प्रवास आणि लॉजिस्टिक्स पथकाचे प्रमुख विविध आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी संपर्कात असून युरोप, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात प्रवास करण्यासाठी इतर पर्यायांवर चर्चा करीत आहेत. आयसीसीचे सुरक्षा सल्लागार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात असून तेही मार्गदर्शन करत आहे, याशिवाय आयसीसीचा प्रवास सपोर्ट डेस्कही कार्यन्वित करण्यात आला आहे.