Thane News: करवसुलीचा धडाका! १,२०६ जणांचा पाणीपुरवठा खंडित; ५१३ मालमत्ता जप्त
esakal March 02, 2026 11:45 PM

ठाणे : आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेरच्या टप्प्यात असताना ठाणे महापालिकेकडे मालमत्ता करापोटी ६३० कोटी रुपये जमा झाले आहे. ९२० कोटींचे उद्धीष्ट गाठण्यासाठी २९० कोटी कर संकलन करण्यासाठी अवघ्या महिन्याभराची मुदत आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेने धकड कारवाईला सुरुवात केली असून ५१३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तर २२३ मालमत्तांना सील ठोकले आहेत. इतकेच नव्हे तर कारवाईनंतरही कर थकवणाऱ्यांची नावे प्रसारमाध्यमातून जाहीर करणार आहेत.

मालमत्ता कर, पाणी पट्टी वसुली आणि शहर विकास विभागाकडे जमा होणारे शुल्क हे ठाणे महापालिकेचे प्रमुख उत्पन्न स्त्रोत आहे. मात्र कोरोनानंतर पालिकेच्या तिजोरीमध्ये अपेक्षित कर जमा होत नसल्याचे दिसून आले आहे. खर्च आणि जमा होणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसवताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

Mumbai: मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार, डालखिचडीमध्ये आढळलं झुरळ; अन्नसुरक्षेचा धक्का!

शहरात विविध विकास प्रकल्प सुरू असताना कर्मचार्यांचे वेतन काढण्यासाठीही शासन निधीवर पालिकेला अवलंबून रहावे लागत आहे. त्यात झालेल्या कामांची आणि सेवा पुरवणार्या ठेकेदारांची बिले काढतानाही प्रशासनाचा घाम निघत आहे. त्यामुळे पालिकेनेकर वसुलीसाठी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मालमत्ता कर विभागाला ९२० कोटींचे उद्धीष्ट देण्यात आले होते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर वसुलीसाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत ६३० कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. मात्र उद्धीष्ट पूर्तीसाठी अजून २९० कोटी रुपये कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी थकबाकीदारांवर कारवाई अधिक तीव्र करण्याचे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावे प्रसारमाध्यमांतून जाहीर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

Mumbai Traffic: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा ६ हजार कोटींचा 'मास्टर प्लॅन' आतापर्यंतची कारवाई
  • ५१३ मालमत्ता जप्त

  • २२३मालमत्ता सील

  • १२०६ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत

सुट्टीच्या दिवशीही संकलन केंद्रे सुरू

करदात्यांना सोयीचे व्हावे यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व प्रभाग स्तरावरील संकलन केंद्रे प्रत्येक शनिवारी सकाळी १०.३० ते सायं. ४.३० प्रत्येक रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत सुरू ठेवण्यात आली आहेत. ठाणे शहरातील २१ संकलन केंद्रांपैकी कोणत्याही केंद्रावर कर भरता येणार आहे.

ऑनलाईन सुविधा

घरबसल्या कर भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ तसेच व्हॉट्सअॅप चॅटबॉट (९१ २२२५३३१५९०) यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Mumbai Crime: सोबत राहण्यास पत्नीचा नकार, पतीनं भर रस्त्यात गाठलं; आधी वाद नंतर चाकूने... मुंबईत रक्तरंजित थरार
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.