MARATHI SERIAL SHUBHVIVAAH ENDS SUDDENLY: टीआरपीच्या बदलामुळे मराठी वाहिन्यांवर काही नवीन मालिका सुरु झाल्या आहेत. तर काही मालिका अचानक निरोप घेताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच आता छोट्या पडद्यावर गेल्या तीन वर्षांपासून मनोरंजन करणारी मालिका ऑफ एअर झाली आहे. नुकतीच या मालिकेनं १ हजारचा टप्पा गाठला होता.
स्टार प्रवाहवरील एक प्रसिद्ध मालिका गेल्या अनेक दिवसापासून दुपारचं सत्र गाजवत होती. परंतु काल त्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेनं अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. 16 जानेवरी 2023 रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. तर 1 मार्च रोजी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.
View this post on InstagramA post shared by Shubh Vivah official page (@shubh_vivah_official_page)
दमदार कनाथकासह उत्तम कलाकार असलेल्या या शुभविवाह मालिकेनं ३ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील पात्र झाले होते. या मालिकेचा दुपारचा टप्पा सुद्धा लोकप्रिय झाला होता. परंतु अचानक ही मालिका संपल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.
मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार या कलाकरांना भरभरुन प्रेम मिळालं. या कलाकारांनी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान १ मार्च रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. कलाकारांनी सेटवर केक कापून मालिकेच्या यश साजरा केला. दरम्यान ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांनी खंत व्यक्त केलीय.
या मालिकेचा शेवटचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीकडून शेअर करण्यात आला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. नेटकऱ्यांच्या मते प्रत्येक मालिका संपण्याआधी प्रोमो शेअर केला जातो. परंतु अशाप्रकार प्रेक्षकांना कोणतीही पुर्वसूचना न देता मालिका संपल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
'आता काय कॅमेरा तोंडात टाकतो काय?' रणबीर कपूर पापाराझींवर भडकला, Viral Video