इराणने युद्धात सौदीपासून कुवैतपर्यंत हंगामा केला आहे. इराणने आधी कुवैतच्या बेस वरुन उडणाऱ्या एफ-१५ जेट फायटरना टार्गेट केले. मात्र नंतर हे जेट फायटर कुवैतनेच चुकून उडवल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. त्यानंतर इराणने सौदीच्या इंधन कंपनीवर मोठा हल्ला केला. इराणने सौदीच्या तनुरा रिफायनरीला टार्गेट केले. येथूनच सौदीची सर्वात श्रीमंत इंधन कंपनी अरामकोचे संचलन होते. इराणने याशिवाय तुर्की, कतार सारख्या देशांवर हल्ले केले. विशेष म्हणजे इराणने हे हल्ले ड्रोनने केले आहेत. इराणने सोमवारी एकूण १७ देशांवर ड्रोनने हल्ले केले आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलनुसार इराणने युद्धाच्या पहिल्याच दिवशी १००० ड्रोनने हल्ले केले. सर्वाधित २०० ड्रोन हल्ले दुबईवर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी इराणने दुबईच्या धर्तीवर कुवैत आणि सौदीवर ड्रोन हल्ले केलेत ज्यामुळे कमी खर्चात इराणने जास्त नुकसान केले आहे.
इराणकडे आहे जगातले सर्वात खतरनाक ड्रोनइराणकडे जगातले सर्वात खतरनाक हल्लेखोर ड्रोन आहे. ज्याचे नाव शाहेद-१३६ आहे.या ड्रोनने युक्रेनमध्येही हंगामा केलेला आहे. आता इराण याचा वापर मध्य पूर्वेत करत आहे. अमेरिकेच्या तळांवर इराण ड्रोन हल्ले करत आहे, इराणकडे एकून ८० हजार ड्रोन आहेत.
या ड्रोनद्वारे गुप्त माहिती जमा करण्याशिवाय त्याचा वापर हल्ल्यासाठी देखील करत आहे. इराणकडे हल्ला करणे आणि शस्रास्रे घेऊन जाणारे एकूण १२ पद्धतीचे ड्रोन आहेत. परंतू सर्वात धोकादायक शाहेद ड्रोन आहे. शाहेद – १३१ आणि शाहेद – १३६ द्वारे कोणावरही हल्ला करता येतो.
शाहेद – १३६ ड्रोनमध्ये अनेक तास हवेत राहण्यासाठी सक्षम आहे. हे ड्रोन २००० किमीपर्यंत जाऊन हल्ला करु शकते. याचा वेग २०० किमी प्रति तास इतका आहे. हल्ल्याच्या तयारी आधी ड्रोनमध्ये विस्फोटक भरले जाते. हे ड्रोन कोणत्याही वस्तू सोबत धडकले मोठा ब्लास्ट होतो.
या एका ड्रोनची किंमत १८ ते २० लाख रुपयांपर्यंत आहे. इराणने दरवर्षी २५ हजार ड्रोनची निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. या ड्रोनला इराणने रशियाच्या मदतीने तयार केले आहे. याच जानेवारीत १००० शाहेद-१३६ ड्रोन इराणने तयार केले आहेत.
इराणचा प्रयत्न कमी खर्चाच्या स्फोटकांद्वारे अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करण्याचा आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त नुकसान होत आहे.यंदा इराण स्ट्रॅटजीने अमेरिकेला फसवत आहे.कारण त्याचा प्रयत्न अमेरिकेला जास्त दिवस युद्धात गुंतवायचा असल्याचे अमेरिकन थिंकटँक डिफेन्स प्रीयरिटीचे मिडल इस्ट प्रोग्रॅमचे संचालक Rose Kelanic यांनी सांगितले.